Youth Falls From Train: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यानची घटना

Youth Fell From from running Chennai Express: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेन असताना तरुणाचा मेलमधून पडून मृत्यू झाला.
Youth Died Aafter Falling From Train
Youth Died Aafter Falling From Trainsaam tv

Youth Died Aafter Falling From Train: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानका धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कादरूउल्ला रफिक खान असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कादरूउल्ला रफिक खान हा तरुण रविवारी चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान तो रेल्वेच्या डब्याच्या दरवाज्याजवळ उभा होता. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेन असताना त्याचा मेलमधून पडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

Youth Died Aafter Falling From Train
Shiv Sena Crisis: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आज दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार?

मिळालेल्या माहितीनुसार कादरूउल्ला रफिक खान हा आपल्या नातेवाईकांसोबत मद्रास येथून चेन्नई एक्सप्रेसने कुर्ला येथे येत होता. यावेळी चेन्नई एक्सप्रेस बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असताना तो मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. दरम्यान तोल जाऊन तो रेल्वेतून बाहेर पडला आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला. (Mumbai News)

Youth Died Aafter Falling From Train
Maharashtra Bhushan Puraskar Sohala: उद्धव ठाकरे, अजित पवारांकडून अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस; ढिसाळ नियोजन, हलगर्जीपणामुळे घटना घडल्याची टीका

मृत कादरूउल्ला याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com