शांताराम काळे
अकोले (जि.नगर) : भंडारदरा जलाशयात सापडलेला मृतदेहाचा तपास राजूर पोलिसांना लागला आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्या व फोटो यामुळे हा तरुण सागर विजय थोरात कोल्हार येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या नातेवाईकांना दुपारी फोन लावून कल्पना दिली. प्रत्यक्ष येऊन हा मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नातेवाईक मित्र उपस्थित होते.
राजूरचे सहायक पोलिस अधिकारी नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी शोधकामात सहकार्य केले. घरातून लग्नास जातो, असे सांगून हा तरूण निघाला होता. मात्र, त्याने शनिवारी जलाशयात उडी घेतली. त्यानंतर तो गायब झाला. The youth from Kolhar drowned in Bhandardara dam
काही व्यावसायिकांनी ही घटना बघितली. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनेचा तपशील दिला. मात्र, पोलिसांनी स्थानिक पोहणारे आणले. त्यांच्यामार्फत शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. मात्र, काल दुपारी स्पिल वेजवळ त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
पोलिस कॉन्स्टेबल दत्ता परते, उपनिरीक्षक नितीन खैरनार, स्थानिक सरपंच पांडुरंग खाडे, वसंत भालेराव यांनी मृतदेह बाहेर काढला. काल सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र आणि वर्णन टाकण्यात आले होते. तर वृत्तपत्रांतदेखील वृत्त प्रसिद्ध होताच त्याच्या मित्रांनी राजूर पोलिसांना संपर्क करून हा तरुण कोल्हार येथील सागर विजय थोरात असल्याचे सांगितले. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.The youth from Kolhar drowned in Bhandardara dam
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.