पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचे बौद्ध विहार; डॉ. आगलावेंच्या दाव्याने खळबळ

Controversial Statement About Vitthal Temple : यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती.
Dr. Pradeep Aglave Controversial Statement About Vitthal Temple
Dr. Pradeep Aglave Controversial Statement About Vitthal TempleSaam Tv
Published On

नागपूर: पढंरपूरचे पांडूरंग मंदिर (Vitthal Temple) हे पुर्वी बुद्ध विहार (Buddha Vihar) होतं असा खळबळजनक दावा करत ही मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना (Buddhist Peoples) हस्तांतरित करा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे (Dr. Pradeep Aglave ) यांनी केली आहे. (The Vitthal Temple at Pandharpur is a former Buddhist monastery; Dr. A new argument with Aglave's claim)

हे देखील पाहा -

डॅा. प्रदीप आगलावे म्हणाले की, “पंढरपूरचे (Pandharpur) विठ्ठल मंदिर हे पूर्वी बौद्ध धर्माचे विहार होते, आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बुद्ध विहारे होती. तसेच आमची विहारं पाडून मंदिरं आणि मस्जिदी बनवल्या गेल्या” असा दावाही डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे. त्यामुळे सध्या ज्ञानवापीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमची विहारं परत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Dr. Pradeep Aglave Controversial Statement About Vitthal Temple
कपिल सिब्बलांचा काँग्रेसचा राजीनामा; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

डॉ. प्रदीप आगलावे पुढे म्हणाले की, “संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पूर्वीची बुद्ध विहारे होती हे सिद्ध केलंय. दिवंगत प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले की, “ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या” असं डॅा. आगलावे म्हणाले. त्यांमुळे ही सर्व मंदिरं पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करा आणि आमची विहारं परत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. देशात एकीकडे मंदिर, मस्जिद यावरुन देशात वाद सुरु असताना आता विहारांच्या मुद्द्यावरुनही वातावरण तापू शकतं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com