उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने फोडली पाईपलाईन

उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीकडून चक्क ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फोडून ग्रामपंचायतीला अंधारात ठेवण्यात आले.
उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने फोडली पाईपलाईन
उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने फोडली पाईपलाईनअरुण जोशी
Published On

अमरावती: जिल्ह्यातील तिवसा tivsa तालुक्यातील गुरुकुंज मोझरी guruganj mozari गावात तब्बल आठ दिवसांपासून पाण्याचा थेंब नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून water supply tank पाणी तर सोडण्यात येते मात्र ते पाणी गावात पोहचत का नाही, याचा शोध घेण्यात आल्यानंतर अखेर आज गुरुदेवनगरवासीयांचे हजारो लिटर पाणी हे मातीमोल wastage of water झाल्याची बाब उघडकीस आली. उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीकडून चक्क ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन pipeline फोडून ग्रामपंचायतीला Gram Panchayat अंधारात ठेवण्यात आले.

हे देखील पहा -

शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी अलीकडेच गुरुकुंज उपसा सिंचन योजना Upsa Irrigation Scheme मंजूर झाली. त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याचा एक प्लांट हा दासटेकडीच्या वरच्या भागाला आहे आणि त्याच भागातून गुरुदेवनगर गावासाठी पाणीपुरवठा योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे जाते. असे असताना कंत्राटदार कंपनीच्या Contractor Company कामात गुरुदेवनगर गावाची पाईपलाईन फुटली त्यामुळे त्यातील पाणी हे पुरासारखे वाहू लागले. याकडे कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आले असून उलट यातील पाणी तेथीलच प्लांटवर वापरण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. दरम्यान पाईपलाईन कुठे फुटली याचा शोध लागला.

उपसा सिंचन योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने फोडली पाईपलाईन
अवघ्या १२ वर्षाच्या असताना दिलीप कुमार यांच्यावर होते सायरा बानोचे प्रेम

सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी दासटेकडीवरील ठिकाणी पाचारण करून सदर पाईपलाईन जोडून पाणीपुरवठा सुरळीत केला. याप्रकरणी कंपनीविरुद्ध तिवसा tivsa police station पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल complaint केल्याचे सरपंच sarpanch अर्चना खारोडे यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com