रंग तोच पण राजमुद्रेऐवजी रेल्वे इंजिन, मनसेचा झेंडा पुन्हा बदलतोय?

मनसेची स्थापना झाली त्यावेळी झेंडा हा विविध रंगांचा होता. त्यात वर निळा आणि तळाला हिरवा रंग होता.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV
Published On

औरंगाबाद: राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेच्या चर्चेसोबतच औरंगाबाद (Aurangabad) शहरात आणि सभेच्या ठिकाणी लावलेल्या झेंड्याचीही चर्चा सुरू झाली आहे. कारण त्या झेंड्यात राजमुद्राऐवजी मनसेचं (Manase) इंजिन आहे. हे झेंडे पाहून राज ठाकरे पुन्हा झेंडा बदलत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. जानेवारी २०२० मध्ये मनसेचा नवा झेंडा लॉन्च झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांची राजमुद्रा झेंड्यामध्ये वापरली गेली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेमध्ये तो झेंडा दिसला, पण यावेळी रेल्वे इंजिन असलेले झेंडे लावण्यात आले आहेत.

मनसेची स्थापना झाली त्यावेळी झेंडा हा विविध रंगांचा होता. त्यात वर निळा आणि तळाला हिरवा रंग होता. तर मध्ये या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता. याकाळात मनसे स्टाईल महाराष्ट्रात नव्यानं जन्माला आली. पण ती स्टाईल फार काळ महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडली नाही. अखेर राज ठाकरे यांनी झेंडा बदलला, आणि प्रखर हिंदुत्त्वाची वाटचाल सुरू केली, हे हळुहळु महाराष्ट्रासमोर आले.

२०२० मध्ये नव्यानं आणलेल्या मनसेच्या नव्या झेंड्यात संपूर्ण भगवा रंग आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. त्या झेंड्यावर तीन रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. पण आता त्यातही हळूहळू बदल होताना दिसतो आहे. मनुष्याला उभारी देण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू आहे मात्र त्या प्रयोगाला खरंच यश मिळतं का ती केवळ सभेला गर्दी आणि झेंड्याची चर्चा मनुष्याच्या वाट्याला येते हे येणारा काळ ठरवेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com