मिनीमंत्रालय निवडणूकांचे अखेर बिगूल वाजले; राजकीय वातावरण तापले

वाशीम जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील 14 जिल्हा परिषद सदस्यांच्या रिक्त पदांची निवडणूक जाहीर झाली असून,19 जुलैला मतदान होणार आहे.एकाच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मिनीमंत्रालयाचा अखेर बिगूल वाजला; राजकीय वातावरण तापले
मिनीमंत्रालयाचा अखेर बिगूल वाजला; राजकीय वातावरण तापलेगजानन भोयर
Published On

गजानन भोयर

वाशीम जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील 14 जिल्हा परिषद सदस्यांच्या रिक्त पदांची निवडणूक जाहीर झाली असून,19 जुलैला मतदान होणार आहे.एकाच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजीत आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषीत करण्यात आले होते. मात्र घोषीत आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षण अधिक होते . त्यामुळे या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचीका दाखल केली होती. यावर सुनावनी होवून उच्च न्यायालयाने निवडणूकीला स्थगिती दिली होती .

तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारीणीला मुदतवाढ दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचीका दाखल करून घेत, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. आयोगाने यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका घेतल्या होत्या. दरम्यान या याचीकेवरील सुनावनी सुरुच होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मागास प्रवर्गातील जागावरील निवडणूका रद्द ठरवील्या होत्या. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील दोन आठवडयात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा . असे आदेश दिले होते आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

मिनीमंत्रालयाचा अखेर बिगूल वाजला; राजकीय वातावरण तापले
''तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर सत्तेतुन बाहेर पडा''

जिल्हा परिषदेमधील एकूण 52 जागा पैकी 14 जागांवर निवडणूक होत आहे काटा , पार्डी टकमोर, उकळी पेन,पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, भामदेवी, कुपटा, फुलउमरी, आसेगाव, तळप,या गटांचा समावेश आहे. असा आहे कार्यक्रम नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 29 जुन ते 5 जुलै पर्यंत मुदत असणार आहे. 6 जुलैला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. 19 जुलैला मतदान होणार असून 20जुलैला निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

पंचायत समितीचीही निवडणूक

या जिल्हा परिषद निवडणूकीबरोबर जिल्ह्यातील 19 जागांचीही पोटनिवडणूक होत आहे.या गणांमधे अनेक पदाधिकारी पदमुक्त झाले होते.या ठिकाणीही निवडणूक होणार असल्याने ग्रामीण भागात वातावरण तापले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com