अभिजीत घोरमारे
भंडारा: शासकीय अधिकार द्या 3 महिन्यात राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ असा खळबळ जनक वक्तव्य ओबीसी खात्याचे माजी केबिनेट मंत्री संजय कूटे यांनी केले असून महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्ते पणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविले गेल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. ते आज भंडाऱ्यात आल्यावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना "तुमचे सत्तेत कोणीही ऐकत नाही. तुम्ही खरे ओबीसी नेते असाल तर लाचारी न पत्कारता सत्तेतुन बाहेर पडा असे आव्हाहन केले आहे.
जर सत्तेची लालसा तुम्हाला पद सोडन्यास अडवत असेल तर आम्हाला केवळ शासकिय अधिकार द्या 3 महिन्यात आम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ असेही ते म्हणाले. यावेळी संपूर्ण राज्यात 26 जूनला भाजपाद्वारे ओबीसींच्या प्रश्नासाठी रास्तारोखो करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.