MNS: भोंग्यांचा मुद्दा थेट केंद्रात; मनसेच्या नेत्याची अमित शहांकडे धाव

मशिदींवरील भोंग्यांविरोधातील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तात्काळ पालन होण्यासाठी केंद्रीय गृह मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
MNS/Amit Shah
MNS/Amit ShahSaam TV
Published On

नाशिक : मशिदींवरील भोंग्यांविरोधातील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तात्काळ पालन होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे केली आहे. याबाबत मनसेकडून गृहमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ०३ मे २०२२ पर्यंत दिलेल्या मुदतीच्या पार्श्वभूमीवर मशिदींवरील भोंग्यांविरोधातील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करण्यास राज्य सरकार धरसोड धोरण अवलंबित असतांना मा. केंद्रीय गृह मंत्र्यांनी याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी पवार यांनी पत्राद्वारे केली.

भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयास जगण्याचे, आपल्या धर्माचे पालन करण्याचे समान अधिकार दिले असून संविधानाच्या कलम २५ ते २८ मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याचा, व त्याप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र तसे करतांना इतर नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचे घटनेत अभिप्रेत आहे.

हे देखील पहा -

भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून अनेक मुस्लीम देशांत यावर कडक निर्बंध आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात (Appeal (civil) 3735 of 2005) मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत असून प्रत्येक भारतीयास घटनेने कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. मा. सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्यायसंस्था आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे संपूर्ण देशात तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे.

यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ०३ मे २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या या मुदतीस अकारण धार्मिक रंग देत विविध पक्षांतील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात येत आहेत. राज्यातील गृहमंत्री या संवैधानिक पदावर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरविण्यात येणार नसल्याचे वक्तव्य करत राज्यातील पोलीस सज्ज असल्याचा दिलेला इशारा हा सर्वोच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील निकालाचे स्पष्ट उल्लंघन आहे.

MNS/Amit Shah
Hanuman Chalisa: मनसेनंतर मुंबईत शिवसेनाही हनुमान चालीसा पठन करणार

मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारनेच पुढाकार घेत मशिदींवरील भोंगे तात्काळ उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृह मंत्री मा. ना. अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com