Hanuman Chalisa: मनसेनंतर मुंबईत शिवसेनाही हनुमान चालीसा पठन करणार

उद्या मुंबईत शिवसेना आमदारांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालीसेचं वाचन केलं जाणार आहे.
Hanuman Chalisa/ Shivsena
Hanuman Chalisa/ ShivsenaSaam TV
Published On

मुंबई : मनसेनंतर मुंबईत शिवसेनाही हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठन करणार आहेत. दादर गोल मंदिर येथे उद्या आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालीसा वाचन केलं जाणार आहे. एकीकडे राज ठाकरेंनी लावून धरलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि सतत सेनेवरती (Shivsena) हिंदुत्व सोडल्याचे केले जाणारे आरोप या सर्व प्रकरणानंतर आता शिवसेना आमदारांनी हनुमान चालीसा वाचनाचा कार्यक्रम हाती घेतल्याने सेना अजून आपण हिंदुत्व सोडलं नसल्याचं दाखवून देत आहे.

Hanuman Chalisa/ Shivsena
ठाकरे कुटुंबावर सोमय्यांनी कोणकोणते आरोप केले? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, हनुमान जयंती दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भोंगे लावत हनुमान चालीसा वाचावी. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व राखण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेत नसतील तर आम्ही मातोश्रीवर जाऊन भोंग्यांवर हनुमान चाळीसा वाचन करू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com