अंगी नाही बळ अन् उगाच काँग्रेसची धावपळ

अहमदनगर महापालिका
अहमदनगर महापालिका

अहमदनगर ः आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेस आणि भाजपने रणनीती आखली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळाचा राग आळवला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही हाक केव्हाच दिली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर महाराष्ट्रात जोमाने स्वबळाचा नारा दिला आहे.

स्वबळाच्या या घोषणेचे काही काँग्रेसजन समर्थन करीत आहेत. अहमदनगर महापालिका परिक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही स्वागत केलं आहे. स्वबळावर लढलो तरच पक्षाची ताकद कायम राहील, असे त्या नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेचे स्वागत केलं आहे. The Congress party will not form an alliance in the elections

अहमदनगर महापालिका
मॅडम, मी सगळं मॅनेज करून तुम्हाला कमावून देतो..

काळे हे पक्षीय राजकारणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मंत्री थोरात हे नेहमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी आदबीने वागतात. ते स्वबळाच्या भूमिकेबाबत फार आक्रमक भूमिका घेत नाहीत. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीचे स्वागत केलं आहे.

नगरमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आमदार आहेत. काँग्रेसचे काळे आणि जगताप यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. काळे यांना वाटते राष्ट्रवादीने नेहमीच काँग्रेसवर अन्याय केला. महापालिकेत सर्वच वार्डात काँग्रेसचे मतदार आहेत. परंतु राष्ट्रवादी नेहमीच जागा वाटपात काँग्रेसवर अन्याय करते.

ज्या वार्डात काँग्रेसचे बळ आहे, तेथे जागा सोडल्या जात नाही, आणि तेथे दुसऱ्या पक्षाची ताकद आहे, तेथे जागा देऊन बोळवण केली जाते. त्यामुळे आघाडीच्या राजकारणात काँग्रेसला फायदा होतो. परिणामी काँग्रेसचे खच्चीकरण झाले आहे.

पक्षाने ज्या ज्या वॉर्डात उमेदवार विजयी होऊ शकतात, त्या त्या वॉर्डातील कार्यकर्त्यांना आतापासूनच बळ दिल्यास आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असे काळे यांना वाटते.

पक्षाची ताकद किती...

काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक हे खासदार सुजय विखे पाटील यांना मानणारे आहेत. ते नेहमीच त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करतात. आमदार संग्राम जगताप यांच्यासोबतही त्यांचे सख्य आहे. त्यामुळे काळे यांचा स्वबळाचा नारा भाकड आहे. काँग्रेसमधील दुसरा गट पक्षाची ताकद पाहून निर्णय घेतले जावेत, अशा विचारांचा आहे.

The Congress party will not form an alliance in the elections

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com