अहमदनगर : अर्ज-फाटे करून अधिकाऱ्यांना अडकविणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. शेवगावातही असाच प्रकार झाला आहे. मॅडमला कमवून देण्याचेही त्याने आमिष दाखवले होते. अनेकदा फोन करून, मेसेजद्वारे तसेच कार्यालयात येऊन संबंधिताने ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच विनयभंगही केला, अशी तक्रार शेवगाव तालुक्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने दिली आहे. संबंधिताविरूद्ध शेवगावात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुका प्रशासनातील वरिष्ठ महिला अधिका-यास अशा प्रकारे त्रासास सामोरे जावे लागल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा (राहणार - मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या बाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव येथे शासकीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मे २०२० पासून संबंधित व्यक्ती कार्यालयात चकरा मारून व फोनव्दारे माझ्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करीत होती. कार्यालयात येवून मी अवैध धंदे सुरु ठेवण्यास मदत करतो. त्यातून येणारे पैसे तुम्हास पोहच करीत जाईल. असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, कार्यालयीन काम असेल तेवढेच बोला. इतर वैयक्तिक बाबींशी चर्चा करू नका. असे त्यास फोनवरून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने अश्लिल भाषा वापरली.
पतीलाही पाठवले मेसेज
कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने त्याने माझ्याविरोधात मोहीम उघडली. सोशल मीडियातही त्याने माझी बदनामी केली. पती व मुलीबद्दल फोनवर अश्लील व अर्वाच्य भाषेत संभाषण करून मानसिक त्रास दिला. कार्यालयात एकटे गाठण्याचाही त्याने प्रयत्न केला, असेही संबंधित वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी बलदवा यांच्याविरोधात विनयभंग, अब्रुनुकसानकारक मजकुर वापरणे, निनावी संदेशाव्दारे धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करीत आहेत.
Edited By - Ashok Nimbalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.