नांदेड : नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचे तीव्र पडसाद परळीत उमटले होते. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी परळीत सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य मूकमोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान बियाणी यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी जवळपास ४५ संशयीताना देखील अटक केली असतना, आता या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी खासदार चिखलीकर यांनी अमित शहा भेट घेतली आहे.
नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (BJP MP Pratap Patil Chikhlikar) यांनी दिल्लीत थेट केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित (Amit Shah) शहा यांची भेट घेऊन नांदेडचमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियांणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणेने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.
नांदेडमधील (Nanded) कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्य़ात वाढलेल्या गुन्हेगारीकडे ही लक्ष देण्याची मागणी चिखलीकर यांनी केलीय तर दुसरी कडे कालच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत गृहमंत्याची दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन बियाणीं हत्या प्रकरणात जलदगतीने तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.