परिचारिका संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 21 तारखेपासून सुरू असलेला संप संघटनेतर्फे आज चार वाजेपासून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिचारिका संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश
परिचारिका संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यशभूषण अहिरे
Published On

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे Nursing Association प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 21 तारखेपासून सुरू असलेला संप संघटनेतर्फे आज चार वाजेपासून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या वरिष्ठ सोबत तब्बल दोन तास चाललेल्या ऑनलाईन मीटिंग नंतर परिचारिका संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रिचारिका संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. The agitation started by the nurses union has finally succeeded

हे देखील पहा -

गेल्या कित्येक महिन्यांपासून परिचारिका संघटनांतर्फे विविध मागण्यांची मागणी करण्यात आली होती. परंतु या मागण्यांकडे प्रशासनाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर परिचारिका संघटनातर्फे 21 जून पासून टप्प्याटप्प्याने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते.

परिचारिका संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश
परीचारिकांचा बेमुदत संप सुरू; रुग्णसेवा विस्कळीत

आज पासून म्हणजेच 25 जून पासून मागण्या मान्य होईपर्यंत संपूर्ण काम बंद आंदोलन Agitation सुरू करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत, पुढील पंधरा दिवसांमध्ये परिचारिकांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे ठरविले. अखेर आज संध्याकाळी चार वाजेपासून परिचारिका संघटनांतर्फे सुरू असलेले बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com