परीचारिकांचा बेमुदत संप सुरू; रुग्णसेवा विस्कळीत

राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचार्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील तब्बल 296 परिचारिका आणि परिचर यांनी हे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
परीचारिकांचा बेमुदत संप सुरू; रुग्णसेवा विस्कळीत
परीचारिकांचा बेमुदत संप सुरू; रुग्णसेवा विस्कळीतजयेश गावंडे
Published On

जयेश गावंडे

अकोला : कायमस्वरूपी पदभरती Recruitment, अतिरिक्त खाटांसाठी नव्याने पदनिर्मिती, परिसेविका, अधिसेविका, पाठ्यनिर्देशिकांची रिक्त पदे पदोन्नतीने Promotion भरावी. राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व कर्मचार्यांना केंद्र शासनाप्रमाणे Central Government जोखीम भत्ता द्यावा यासह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील तब्बल 296 परिचारिका आणि परिचर यांनी हे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे. Indefinite strike of nurses in Akola

यामुळे शासकीय रुग्णालयातील Hospital रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. यापूर्वी 21 व 22 जून रोजी महाराष्ट्र परिचारिका संघटनेतर्फे राज्यभरात दोन तासांचे कामबंद आंदोलन Agitation केले होते; मात्र शासनातर्फै कुठलेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आंदोलनाच्या दुसर्या टप्प्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे 23 आणि 24 जून दरम्यान राज्यभरातील State परिचारिका पूर्णवेळ कामबंद ठेवले होते, तर तिसऱ्या टप्यात 25 जून पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

हे देखील पहा-

कोरोनाकाळात Corona जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 25 जूनपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे Maharashtra State Nurses Association देण्यात आला होता.

परीचारिकांचा बेमुदत संप सुरू; रुग्णसेवा विस्कळीत
वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पत्नीचाच खून !

राज्यातील सर्व परिचारिका कोविड रुग्णांना सातत्याने सेवा देत आहेत. परंतु याकाळात इतर सर्व विभागातील कर्मचारी घरी बसून होते. परंतु, परिचारिका आपल्या कुटुंबापासून, मुला-बाळांपासून दूर राहून रुग्णसेवा दिली. गेल्या वर्षी देखील राज्यातील परिचारिकांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन Agitation केले. मात्र, अद्याप सुद्धा या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.

परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना परिचारिकांवर प्रचंड ताण पड़त आहे. कोरोना रोटेशन काळात शासनाने परिचारिकांची साप्ताहिक सुटीही बंद केली. जीवाची बाजी लावून लढणाऱ्या अनेक परिचारिकांकडे शासन अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत असून, आता परिचारिकांच्या सहनशीलतेची सीमा संपली आहे, आता मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहेत मागण्या ?

  1. परिचारिकांची पदे १०० टक्के भरावीत.

  2. परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे जोखिम भत्ता ७२०० देण्यात यावा.

  3. क्वारंटाईन, रज़ा व साप्ताहिक सुटी देण्यात यावी.

  4. परिचारिकांचे पदनाम बदल करण्यात यावे

  5. कोरोनाकाळात सर्व रजा स्थगित केल्यामुळे ३०० पेक्षा जास्त रजा शिल्लक राहून रद्द होत आहेत. त्या शिल्लक ठेवण्याची आणि त्या पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी.

  6. सातव्या वेतन आयोगाचे व महागाई भत्त्याचे थकीत हप्ते देण्यात यावे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com