Drugs Case: ठाण्यात नायजेरियन ड्रग्ज पॅडलरला अटक, 1 कोटी 12 लाखांचे कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे.
Drugs Case
Drugs CaseSaam Tv
Published On

ठाणे: कोकेन आणि मेफेड्रॉन पावडर (MD) या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून 274 ग्रॅम कोकेन आणि 60 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर असा एकुण 1 कोटी 12 लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे (Thane Crime Branch Arrest Nigerian Drug Peddler And Seized Cocaine And MD Drugs Worth Rs 1.12 crore).

Drugs Case
महिलांच्या कपड्यात लपवले ४ किलो ड्रग्ज, समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी

नेमकं काय घडलं?

ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोड वरील 'द बाईक सुरज प्लाझा' हॉटेलचे गेट समोर, आनंदनगर नाका येथे एक नायजेरियन व्यक्ती हा कोकेन (Cocaine) आणि मेफेड्रॉन पावडर (MD Drugs) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला (Thane Crime Branch) मिळाली. गुन्हे शाखेच्या वागळे घटक-5 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.

वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून डिक्सन चिडीबेरे इझे (वय 30) याला कोकेन आणि एमडी ड्रग्जसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरोधात कासारवडवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर करीत आहेत.

Drugs Case
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक

या आरोपीकडून पोलिसांनी 274 ग्रॅम कोकेन आणि 60 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर असा एकुण 1 कोटी 12 लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच, गुन्हयात वापरलेली 1 ह्युंडाय आय-20 कार, 6 मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 1 कोटी 17 लाख 38 हजार 360 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीकडे त्याचे नावे असलेला रिपब्लीक ऑफ नायजेरियाचा पासपोर्ट मिळाला आहे. त्याच्याकडे मिळालेले कोकेन हे अंमली पदार्थ त्याने आफ्रिकन (Africa) देशातून आणले होते. त्याने ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) येथे बऱ्याच लोकांना अंमली पदार्थ विकल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झालेली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सध्या आरोपीला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी देखील आरोपीने अशा प्रकारचा गुन्हा केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com