ठाकरेंनी वाढवलं शिंदे फडणवीसांचे टेन्शन, महापौरांची निवडणूक लढणार ठाकरेसेना?

Mumbai Mayor Election Twist: मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरेसेना मैदानात उतरण्याची शक्यता आहे.. मात्र ठाकरेसेना महापौरपदासाठी नेमकं कसं गणित जुळवणार आहे.. आणि भाजपला कसा शह देण्याची शक्यता आहे..
Uddhav Thackeray’s strategic move has added a dramatic twist to the Mumbai Mayor election battle
Uddhav Thackeray’s strategic move has added a dramatic twist to the Mumbai Mayor election battleSaam Tv
Published On

11 फेब्रुवारीला मुंबईकरांना ४ वर्षांनी महापौर मिळणार हे निश्चित झालंय... मात्र या महापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरेसेनेनं थेट सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचं टेन्शन वाढवलंय... ठाकरेसेनेनं महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार देण्याचे संकेत दिलेत... एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी पक्षाचे नेते, गटनेते, वरिष्ठ नगरसेवकांची बैठक बोलावण्यासोबतच नगरसेवकांना मुंबईबाहेर न जाण्याचे आदेश दिलेत... दुसरीकडे ठाकरेंनी मुंबईत नाही तर पाकिस्तानच्या निवडणुकीतही अर्ज भरावा, असा खोचक टोला लगावलाय..

मात्र हा वाद इथंच थांबत नाहीये.. संजय राऊतांनी भाजपचा महापौर झाला तर तो मुंबईसाठी काळा दिवस असेल, अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केलाय... दुसरीकडे मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे... ठाकरेसेनेनं महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार देण्याची रणनीती आखली असली तरी अजूनही राज ठाकरेंची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे... मात्र इथे हे ही लक्षात घ्यावं लागेल की कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसे शिंदेसेनेला पाठिंबा देत त्यांच्या आश्रयला गेलीय. . आता बहुमत नसतानाही ठाकरेसेना महापौर आणि उपमहापौरपदाचा डाव का खेळत आहे... त्यामागे कारण आहे महायुतीतील अंतर्गत धुसफूस...

कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात शिंदेसेनेचा महापौर बनल्यानं मुंबईत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीवर भाजपने दावा ठोकलाय... जर असं समीकरण झालं तर शिंदेसेनेच्या 29 नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे... हे नगरसेवक तटस्थ किंवा गैरहजर राहिले तर भाजपकडे 89 नगरसेवकांचंच संख्याबळ असेल.. तर ठाकरेसेनेचे 65, मनसेचे 6, काँग्रेसचे 24, समाजवादी पक्षाचे 02 आणि दोन्ही राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक यांसह ठाकरेसेना 101 जागांपर्यंत मुसंडी मारु शकते.. तर एमआयएमचे 8 नगरसेवकही तटस्थ राहण्याची शक्यता आहे... त्यामुळेच ठाकरेसेनेने हा डाव खेळलाय..

आतापर्यंत महापौरपदासाठी निर्धास्त असलेल्या भाजपपुढे ठाकरेसेनेनं आव्हान उभं करण्याची तयारी केल्यानं मुंबईच्या महापौरपदावरुन ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे... त्यामुळे महापौरपदाचं गणित जुळवण्यात भाजप बाजी मारणार की आकड्यांची जुळवाजुळव ठाकरेंच्या पथ्यावर पडणार... आणि यावर मुंबईकरांचा महापौर ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com