देशात इंडिया आघाडीच्या आंदोलनाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे राज्यात ठाकरेसेनेनं महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जनआक्रोश आंदोलन केलं.. मुंबईतल्या आंदोलन स्वत: उद्धव ठाकरे उतरले. तर पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या पालिका असलेल्या शहरांमध्ये ठाकरेसेनेनं शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिली.
महाविकास आघाडीतील पक्षांना सोबत न घेता ठाकरेंनी राज्यात स्वतंत्र आंदोलनाचं हत्यार उपसलं. एवढंच नव्हे तर धनखड यांना समज न देता थेट पदावरून हटवलं...तर मग राज्यातल्या मंत्र्यांना समज देऊन का सोडलं.? असा सवाल ठाकरेंनी केलाय. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी ठाकरेसेनेच्या आंदोलनावर टीका केलीय.
वादग्रस्त मंत्र्यांच्या मुद्यामुळे महायुती सरकार वारंवार बॅकफूटवर जावं लागलंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र यात ठाकरेसेनेनं जनआक्रोश आंदोलनातून आघाडी घेतलीय. या आंदोलनातून ठाकरेंनी काय साधलं पाहूयात..
ठाकरेसेनेची पालिकांवर नजर
भ्रष्टचाराचा मुद्दा तापत ठेवून सरकारची कोंडी करण्याची खेळी
राज्यभरात ठाकरेसेनेची पक्षाची ताकद दाखवली
आंदोलनातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न
आगामी निवडणुकीत आघाडी-युती काही झाली तरी आपल्याकडेच नेतृत्व ठेवण्याचे संकेत
जनआक्रोश आंदोलनातून मराठीच्या मुद्यानंतर पालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झालयं. त्यात ठाकरेंनी राज्यात स्वतंत्र आंदोलन करून युती कोणीशीही झाली तरी राज्याचं नेतृत्व आपल्याकडेच राहणार असल्याचे संकेत दिलेत. ठाकरेसेनेच्या आंदोलनाचा विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा मिळणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.