Bhaskar Jadhav: पेच सुटला, ठाकरेंनी डाव साधला! आक्रमक नेत्याच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

Bhaskar Jadhav opposition leader Thackeray Shivsena Group: विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालं आहे.
Uddhav Thackeray and Bhaskar Jadhav
Uddhav Thackeray and Bhaskar Jadhavsaam tv
Published On

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आलीय. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना दावा करणार असून, तशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात येणार आहे. तर, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे.

खरंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडे नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कमी जागा आल्या होत्या.

Uddhav Thackeray and Bhaskar Jadhav
Swargate bus depot: स्वारगेटप्रकरणातील मोठी अपडेट! तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला, पीडितेनं सांगितली सर्व आपबीती

त्यामुळं विधानसभा विरोधीपक्षनेत्याचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. भास्कर जाधव हे आक्रमक नेते असून ठाकरेंना याचा फायदा नक्कीच होईल. मात्र, यावर अंतिम निर्णय राहुल नार्वेकर घेतील, अशी माहिती आहे.

Uddhav Thackeray and Bhaskar Jadhav
Crime news: भंयकर तितकंच विचित्र! आधी त्याला ड्रग्ज देऊन बेशुद्ध केलं, नंतर गुप्तांग कापून घेऊन गेले

अडीच वर्षांचा फॉर्म्युला

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद अडीच-अडीच वर्षे मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केल्याची माहिती आहे. जर ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा आणि काँग्रेसला विधान परिषद विरोधीपक्षनेतेपद मिळत असेल तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची अडीच वर्षांसाठी मागणी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com