ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला 'साम'वर, 6 विधानसभेसाठी ठाकरे बंधूंचा मास्टरप्लॅन

Mumbai BMC Elections: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरलाय... त्यामुळे मुंबईत कोण किती जागा लढवणार? जागावाटपाचा फॉर्म्युला काय आहे? कोणत्या जागांवर ठाकरेसेना आणि मनसेत रस्सीखेच आहे?
Raj Thackeray and Uddhav Thackeray during a joint strategy meeting ahead of the Mumbai BMC elections.
Raj Thackeray and Uddhav Thackeray during a joint strategy meeting ahead of the Mumbai BMC elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजताच आता जागावाटपासाठीच्या जोरबैठका सुरू झाल्यात. महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा पालिका निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार आहे. त्यातच ठाकरेसेना आणि मनसे यांच्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला साम टिव्हीच्या हाती आलाय

दहिसर विधानसभा क्षेत्रात मनसे वॉर्ड क्रमांक 8 आणि 10 मधून निव़डणुक लढवणार आहे.. तर ठाकरेसेनेला 1, 6,7 वॉर्ड देण्यात येणार आहे...बोरिवली विधानसभेत मनसे 14 आणि ९वॉर्ड लढवणार असून ठाकरेसेना 18 आणि 16 वॉर्ड लढवणार आहे... तर मागाठाणेत मनसे 3 आणि 11 वॉर्डमधून निवडणुक लढवणार असून ठाकरेसेनेला 25, 5,4,12 हे वॉर्ड देण्यात येणार आहे... कांदिवली पूर्व मतदारसंघात मनसेला वॉर्ड क्रमांक 23 तर ठाकरेसेना वॉर्ड क्रमांक 24, 27,45 निवडणुक लढणार..

दुसरीकडे या सहा विधानसभा क्षेत्रातील काही वॉर्डवरून मनसे आणि ठाकरेसेनेत रस्सीखेचही पाहायला मिळतेय...बोरिवली विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 13, 17,15 वरून ठाकरेबंधूंमध्ये रस्सीखेच सुरु आहे... मागाठाणे विधानसभेतील वॉर्ड नंबर 5 वरून तर कांदिवली पूर्व विधानसभेतील 24,27 आणि 45 या तीन वॉर्डात ठाकरेबंधूंमध्ये रस्सीखेच आहे...त्याशिवाय चारकोपमधील वॉर्ड क्रमांक 30 आणि मालाड पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमाक 34 आणि 35 चेही जागावाटप पूर्ण झालेले नाहीय...

दरम्यान राज ठाकरे 21 डिसेंबरला पश्चिम उपनगरातील मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत.. तर उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत... त्यामुळे मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरेबंधूंच जागावाटपाचं गणित जुळणार का ..पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com