'महाराष्ट्रात फक्त ठाकरेच' अशा आशयाचे बॅनर अंबरनाथ शहरात लावण्यात आले होते ते राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते करण्यात आली.. एकीकडे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु अाहे त्याचवेळी ठाकरे बंधूंनी आपला मोर्चा ठाणे जिल्ह्याकडे वळवलाय. राज ठाकरेंनी अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण मध्ये दौरा करून पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या तर दुसरीकडे याचं विभागातल्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक घेऊन महत्त्वाचे आदेश दिले.. ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना केलेत पाहूयात...
मतदार यादीतील बनावट मतदार शोधा, याद्या तपासून घ्या, बुथपातळीवर काम करा, असे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.. संशयित आणि दुबार मतदार आढळल्यास त्याची तक्रार स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करा. मतदार यादीतील मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुख्य पोलिंग एजंट आणि सहपोलिंग एजंट तातडीने नियुक्त करा
श्रीकांत शिंदे हे कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातोय. त्यामुळे त्याच्याच बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी फिल्डिंग का लावलीय.
कल्याण- डोंबिवली महापालिका, ठाणे महापालिका आणि अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची ताकद जास्त आहे. त्याशिवाय उल्हासनगर महापालिकेत भाजप वरचढ ठरू शकते. त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी या महापालिका क्षेत्रात शिंदेंना शह देणं ठाकरे बंधूंना महत्त्वाचं वाटतं.. त्यामुळे ठाकरेंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात त्यांचीच कोंडी करण्याचा निर्णय घेतलाय...
गणेश नाईकांकडून आधीच ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.त्यात नाईकांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय अशातच ठाकरे बंधूंनी महत्वाच्या मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्यानं शिंदेंची त्यांच्याच बालेकिल्ल्यात लढा द्यावा लागण्याची शक्यताच अधिक आहे,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.