TET Exam: बोगस शिक्षकांना मिळणार दणका; पैसे देऊन TET प्रमाणपत्र घेतली की नाही, पडताळणी सुरु

TET शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात, 7 हजार 800 शिक्षकांनी पैसे देऊन टीईटी पात्रता प्रमाणपत्र मिळल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
TET Exam: बोगस शिक्षकांना मिळणार दणका; पैसे देऊन TET प्रमाणपत्र घेतली की नाही, पडताळणी सुरु
TET Exam: बोगस शिक्षकांना मिळणार दणका; पैसे देऊन TET प्रमाणपत्र घेतली की नाही, पडताळणी सुरुSaamTV
Published On

बीड : राज्याभरात गाजलेल्या TET शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात, 7 हजार 800 शिक्षकांनी पैसे देऊन टीईटी पात्रता प्रमाणपत्र मिळल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तर आता या गैरप्रकाराचे धागेदोरे बीड जिल्ह्यात पोहोचल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

बीडमधील तब्बल 105 शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे देऊन प्रमाणपत्र (Certificate) मिळवलेल्या शिक्षकांमध्ये धाकधूक वाढली आहे. 2013 पासून आतापर्यंत राज्यात शिक्षक भरती बंद होती, तरी जिल्ह्यात काही ठिकाणी पदे भरण्याची बाब समोर आली आहे.

TET Exam: बोगस शिक्षकांना मिळणार दणका; पैसे देऊन TET प्रमाणपत्र घेतली की नाही, पडताळणी सुरु
Marital Rape: संसदेत मॅरिटल रेपवर कायदा बनवण्याचा मुद्दा उठला, स्मृती इराणी म्हणाल्या - 'सर्व पुरुषांना बलात्कारी म्हणणे योग्य नाही'

नोकरी टिकवण्यासाठी जिल्ह्यातील काही जणांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्याची चर्चा आहे. मात्र आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सर्व प्रमाणपत्राची पडताळणी सुरू केल्यामुळे बोगसगिरी करून बनलेले शिक्षकांचे धाबे दणाणले असून त्यांना दणका मिळण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com