अहमदनगर ः नगर तालुका सहकारी दूध व्यवसाय व प्रक्रिया संघाच्या १० संचालकांनी चेअरमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गुरुवारी (दि.३०) सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
नगर तालुका दुध संघात गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष किसन बेरड विरुद्ध संचालक मंडळ असा संघर्ष सुरु आहे. अध्यक्ष बेरड हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे. या मनमानीला कंटाळून मधुकर मगर, गुलाब कार्ले या २ संचालकांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. Ten directors of Nagar Taluka Dudh Sangh join NCP
दूध संघाची देऊळगाव सिध्दी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली. या सभेमध्ये तालुक्यातील सभासद संस्था प्रतिनिधी तसेच संचालक मंडळाने दूध संघ वाचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या साठी रोहिदास कर्डिले, केशव बेरड यांनी पुढाकार घेतला होता.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बुधवारी (दि.२९) नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता सुपा येथे आमदार नीलेश लंके यांनी या संचालकांची त्यांच्याशी भेट घडवून आणली. या चर्चेनंतर गुरुवारी (दि.३०) सकाळी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यानुसार संघाचे उपाध्यक्ष मोहन तवले, संचालक भाऊसाहेब काळे, गोरक्षनाथ काळे, बजरंग पाडळकर, रामदास शेळके, पुष्पा कोठुळे, वैशाली मते, राजाराम धामणे, स्वप्नील बुलाखे, उद्धवराव अमृते या १० संचालकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, गोविंद मोकाटे, किसनराव लोटके, रोहिदास कर्डिले, केशव बेरड, दूध संघाचे माजी संचालक गुलाबराव काळे उपस्थित होते. Ten directors of Nagar Taluka Dudh Sangh join NCP
संघ ऊर्जितावस्थेत येईल
किसन बेरड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही १० संचालकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षांपासून दूध संघ अडचणीचा सामना करतोय. महाविकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री प्राजक्त तनपुरे,आ. नीलेश लंक, यांच्यामुळे तालुका दुध संघ पुन्हा ऊर्जितावस्थेत येईल.
-भाऊसाहेब काळे, संचालक नगर तालुका दुध संघ.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.