कोरोना काळात उपेक्षितांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणारा अवलिया

गरीब विद्यार्थी पैसे भरून ऑनलाईन क्लास लाऊ शकत नाहीत म्हणून आम्ही सर्वांसाठी मोफत ऑनलाईन क्लास घेत आहोत. आज महाराष्ट्रातील अनेक गरीब मुले या ऑनलाईन वर्गाशी जोडले गेले आहेत.
कोरोना काळात उपेक्षितांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणारा अवलिया
कोरोना काळात उपेक्षितांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणारा अवलियादीपक क्षीरसागर
Published On

लातूर : कोरोनामुळे शाळेची घंटा वाजणे बंद झाले आणि गोरगरीब मुलांचे शिक्षणच ठप्प झाले. अश्यावेळी लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 45 वर्षांच्या शिक्षकाने गरीब मुलांसाठी विनामूल्य ऑनलाईन वर्ग घेण्यास पुढाकार घेतला आणि बघता बघता या मोफत ऑनलाईन वर्गाने थेट राज्यभर गरीब मुलांना एकत्र करीत शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.

कोरोना काळात टाळेबंदी सुरू झाली आणि याचा फटका ग्रामीण भागात मोठया प्रमाणात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोर गरीब मुलांना बसला. अशा वेळी या कठीण परिस्थितीत शिक्षणाविषयी गंभीर असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बुजरुगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक साईनाथ माने यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

हे देखील पहा -

अँड्रॉईड मोबाईल आणि संगणकाच्या मदतीने सुरुवातीला झूम ऍप आणि नंतर गुगल मिटच्या माध्यमातून मुलांना जोडण्याचे काम सुरू झाले. ज्यांची परिस्थिती नाही अशी मुले आपल्या पालकांचे मोबाईल घेऊन रोज ऑनलाईन शिक्षण घेऊ लागले. गेल्या 7 महिन्यापासून आजपर्यंत ऑनलाईन स्पोकन इंग्लिश तसेच व्यक्तिमत्व विकास, गणित विज्ञान, यासोबत योगा प्रशिक्षण देऊन मुलांना मूल्यवर्धित शिक्षण देण्याचे काम साईनाथ माने विनामूल्य करीत आहेत. विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, बीड, पुणे, नगर, नांदेड या जिल्ह्यातील विद्यार्थी देखील यावर्गाला जोडले गेले आहेत.

गरीब विद्यार्थी पैसे भरून ऑनलाईन क्लास लाऊ शकत नाहीत म्हणून आम्ही सर्वांसाठी मोफत ऑनलाईन क्लास घेत आहोत. आज महाराष्ट्रातील अनेक गरीब मुले या ऑनलाईन वर्गाशी जोडले गेले आहेत. हे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञानवर्धित होत आहे असे मत साईनाथ माने यांनी व्यक्त केले. दररोज जवळपास एका वर्गामध्ये मध्ये 70 ते 80 मुले जोडले जात आहेत. वरचेवर ही संख्या वाढत आहे.

कोरोना काळात उपेक्षितांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणारा अवलिया
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल

आता अशा दोन कार्यशाळा रोज घेतल्या जातात. रोज सकाळी 3 तास तर सायंकाळी 2 तास वर्ग चालतात. या ऑनलाईन वर्गासाठी मोफत वेळ देणारे राज्यातील इतर जिल्हा परिषदेचे शिक्षकही पुढे आले आहेत. गोरगरीब मुलांना हे शिक्षण देताना आपणाला मनस्वी आनंद होत असल्याचे साईनाथ माने आनंदाने सांगत आहेत. शाळा बंद झाल्यामुळे वंचित मुले शिक्षणापासून वंचित राहत असतानाच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक माने यांनी मुलांसाठी विनामूल्य ऑनलाईन वर्ग घेण्यास पुढाकार घेतला आणि या ऑनलाईन वर्गामुळे आपले शालेय शिक्षण सुरू राहिले.

शाळा बंद झाल्यानंतर बर्‍याच गरीब विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाची चिंता होती. माने यांनी सुरुवातीला फक्त आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केला होता या मुलांनी इतर विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाबद्दल सांगितले. आता नांदेड, बीड, नाशिक, अशा अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी सिंधुदुर्ग, पुणे आणि मुंबई येथील गरीब मुलेही नियमितपणे या वर्गात सामील होतात.

दररोज सुमारे साडेतीन तास वर्ग घेतले जातात. अर्ध्या तासाचा वेळ इंग्रजी भाषा शिकवण्यासाठीच दिला जातो. चित्रकला, योगा आणि इतर मूल्यवर्धित शिक्षण ऑनलाईन मिळू लागल्याने शिकण्याची प्रक्रिया रंजक बनली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com