Latur Crime: शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

Teacher Arrested for Physical Abusing: विद्यालयातील एका नराधम शिक्षकाने निवासी शाळेतील ३ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या प्रकरणात आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
LAtur
LAtursaam
Published On

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विद्यालयातील एका नराधम शिक्षकाने निवासी शाळेतील ३ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे. मागील तीन महिन्यांपासून मुलांवर अत्याचार सुरू होता. ही बाब समोर आल्यानंतर शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली असून, परिसरातून रोष व्यक्त केला जात आहे.

लातूर येथील एका केंद्रीय विद्यालयाच्या विद्यालयात एक संतापजनक प्रकार घडला. शिक्षकानेच ३ मुलांवर अतिप्रसंग केला. सोपान (वय वर्ष ४९) असे नराधम शिक्षक आरोपीचे नाव आहे. मागिल तीन महिन्यांपासून ३ अल्पवयीन मुलांना धमकी देत होता. धमकी देऊन तो मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा.

LAtur
Buldhana News: "माझी पत्नी आणून द्या"; बायको माहेरी गेली, नवऱ्याची सटकी, पठ्ठ्यानं एसटीच्या काचाच फोडल्या

या घटनेनंतर पीडित तिन्ही मुलांनी मुख्याध्यापकांकडे धाव घेतली. त्यांच्यासमोर आपबिती सांगितली. मुख्यध्यापिकांनी विद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली. तसेच आरोपी शिक्षकाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी नराधम शिक्षक सोपान हा दोषी आढळून आला.

LAtur
Beed News: बीडमध्ये कराड- घुलेची दहशत, पण जेलमध्ये त्यांच्यावर हात टाकणारा अक्षय आठवले कोण?

शिक्षक दोषी आढळल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच सोपान कळमकर याच्या विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com