Ratan Tata Passed Away: मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

DCM Devendra Fadnavis Tribute To Ratan Tata: श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.
Ratan Tata Passed Away: मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis Tribute To Ratan Tata:Saamtv
Published On

DCM Devendra Fadnavis: मायभुमीवर नितांत प्रेम असणारा, भारतमातेचा सच्चा सुपुत्र, सहृदयी उद्योजक, प्रत्येक देशवासियांच्या काळजातला 'भारतरत्न' उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. श्री रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली!

श्री रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले.

फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते.

Ratan Tata Passed Away: मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत

त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Ratan Tata Passed Away: मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Palghar Crime : सराफ व्यावसायिकाकडून ७९ महिलांची फसवणूक; सव्वा कोटीचे दागिने घेऊन पसार, राजस्थानमधून घेतले ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com