Mumbai News: टाटा मेमोरियल रुग्णालयात सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांकडून २४ जणांविरोधात गुन्हा, ११ अटकेत

Tata Memorial Hospital: परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीच कमिशनसाठी रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाडा पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला.
Tata Hospital Staff Crime 24 persons case filed 11 persons police  arrested
Tata Hospital Staff Crime 24 persons case filed 11 persons police arrestedSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Tata Hospital Staff Crime: परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीच कमिशनसाठी रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार भोईवाडा पोलिसांच्या कारवाईतून उघड झाला. रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना चक्क खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते.

सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवून टाटा रुग्णालयातील (Tata Hospital) लाचखोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मदत केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसात २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ११ जणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

Tata Hospital Staff Crime 24 persons case filed 11 persons police  arrested
Railway Track Crack: मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; गँगमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस (Police) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. परळ येथील टाटा रुग्णालयात गोरगरिब कर्करोगग्रस्त उपचारासाठी येत असतात.

मात्र, या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खाजगी लॅबमध्ये पाठवून कमिशनचे पैसे उकळले जात होते. या लुटमारीचे जाळे वॉर्ड बॉयपासून ते सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत विस्तारले होते. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आला.

Tata Hospital Staff Crime 24 persons case filed 11 persons police  arrested
Pune Traffic Update: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प; रस्त्यावर ३ किलोमीटर वाहनांच्या रांगा

सुरक्षारक्षकांनी दोघा वॉर्डबॉयच्या संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवली होती. ज्यावेळी ते दोन वॉर्डबॉय रुग्णालय आवाराच्या बाहेर गेले आणि वैद्यकीय निदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांसोबत सौदा करत होते, त्याचवेळी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे 3 लाख रुपयांची रक्कम सापडली.

अखेर, टाटा रुग्णालयाचे सुरक्षा अधिकारी अनिल शिवाजी भोसले (५६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ४०९, ४०६, ४२०, १२०(ब) भादवि अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी खासगी प्रयोगशाळेच्या व्यवस्थापकासह ११ जणांना अटक केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com