Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोक संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ ला दिल्लीत हे संमेलन होणार आहे. तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे. 1954 मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान आदरणीय अभ्यासक लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
राजधानी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व आहे, कारण केंद्र सरकारने नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिलेच साहित्य संमेलन आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाला विशेष महत्व आलेय. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. ६) पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या आहेत.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे आगामी साहित्य संमेलन पहिलेच 'अभिजात मराठी साहित्य संमेलन' असेल. दिल्लीत संमेलन आयोजित करण्यामागे केंद्र सरकारवर अभिजात भाषेच्या दर्जासाठी दबाव वाढवावा, हाही एक उद्देश होता. मराठीला अभिजात दर्जा, हाच संमेलनाध्यक्षांसह अनेकांच्या भाषणाचा आणि कार्यक्रमाचा एक मुख्य अजेंडा राहण्याची शक्यता होती. केंद्राच्या घोषणेमुळे हा मुद्दा निकाली निघाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.