Rishikesh Sawant : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सुखरुप, पुणे पोलिसांची माहिती

Tanaji Sawant Son Rishikesh Sawant Returned Safely : अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.
Rishiraj Sawant
Rishiraj SawantSaamTV
Published On

पुणे : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे आज सोमवारी दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.

'पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत गेले होते. त्यानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. ऋषीराज सावंतने एक खासगी विमान बूक केलं होतं. ते या विमानातून बँकॉकसाठी रवाना झाले होते. त्यानतंर या खासगी विमान ट्रॅक करण्यात आले होते. त्यानंतर आता ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप आले आहेत. ऋषीराज सावंतांसह एकूण तीनजण होते, ते सुखरुप आहेत. तसेच ते कोणत्या कारणासाठी बँकॉककडे चालले होते? त्यांनी त्यांच्या घरी का सांगितलं नव्हतं? याची माहिती आता चौकशीनंतर समोर येणार आहे', अशी माहिती पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Rishiraj Sawant
GBS Update : पुण्यात GBS गांडुळाच्या गतीने फोफावतोय, आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू; पेशंटचं वय फक्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com