परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गाई - वासरांसह अन्नत्याग आंदोलन

दुध दरवाढ व किसान क्रेडीट कार्ड त्वरित देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज परभणीत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गाई - वासरांसह अन्नत्याग आंदोलन
परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गाई - वासरांसह अन्नत्याग आंदोलनराजेश काटकर
Published On

परभणी : दुध दरवाढ व दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासद पालकांना किसान क्रेडीट कार्ड त्वरित देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज परभणीत अन्न त्याग आंदोलन करण्यात आले. (Swabhimani Shetkari Sanghatana in Parbhani hunger strike movement with cows and calves)

हे देखील पहा -

जिल्हयातील दुध उत्पादक शेतकरी असून गायीच्या दुधाचे शासकीय दर पूर्वी 3.5/8.5 म्हणजे रुपये 27 होता. परंतु खाजगी दर कमी झाल्यामुळे शासनाने शासकीय दर 2 रुपयाने कमी केला. पण सद्यास्थितीत खाजगी दर 29 रु. आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 4 रु. प्रमाणे तोटा सहन करावा लागत आहे. तसेच चारा किंमतीमध्ये मोठया वाढ झाली आहे. त्यातच माहे 11 जुलै 2021 झालेल्या ढगफुटीमुळे संपुर्ण शेतामधील पीक व चारा नाहीसा झाल्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गाई - वासरांसह अन्नत्याग आंदोलन
फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचं बोंबाबोंब आंदोलन !

तसेच दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदासाठी केंद्र शासनाने किसान क्रेडीट कार्डबाबत जिल्हयातील बँकांना पत्र देण्यात आले होते. परंतु अद्यापही बँकेकडून कोणत्याही शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वाटप केलेले नाही. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी दुध उत्पादक व पुरवठादार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाई व वासरासह एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com