बुलडाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या गावातून जणाऱ्या राष्ट्रीय मार्गालगत शासकीय जागेवर पक्के अवैध बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार मेहेकर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. हे शासकीय जागेवर होत असलेलेले पक्के स्वरुपात अतिक्रमण बांधकाम तात्काळ थांबवून डोनगाव येथील ग्रामसेवक यांच्यावर कार्रवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (Swabhimani Shetkari Sanghatana demands to stop illegal construction on government land)
हे देखील पहा-
डोनगाव शहरातून औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर गावात आहे. वाहनांची वर्दळ असते, अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमित जागेवर होणारे व कुठलीही परवानगी नसताना केल्या जात असलेली पक्की बांधकामे तात्काळ थांबविण्यात यावी व संबधित डोनगाव येथील ग्रामसेवकावर कारबाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभामनी शेतकरी संघटनेचे अमोल वाघमारे यानी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जर अवैध बांधकाम थांबविले नाही व ग्रामसेवकावर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल वाघमारे यानी दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.