Malegaon Bandh
Malegaon Bandhsaam tv

Malegaon Bandh News : 'स्वाभिमानी'च्या हाकेला मालेगावकरांचा पाठिंबा, शहरात कडकडीत बंद

यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत हाेता.
Published on

- मनाेज जयस्वाल

Washim News : शेतक-यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana latest news) केलेल्या आवाहनानूसार आज (गुरुवार) मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे आज बाजारपेठेत पुर्णत: शांतता आहे. (Maharashtra News)

Malegaon Bandh
Sugarcane FRP : 1483 काेटी थकबाकी... एफआरपी थकविणा-या कारखान्यांवर कारवाईचे धाडस जिल्हाधिकारी दाखविणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मालेगाव बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व व्यावसायिकांनी आज त्यांचे व्यवहार बंद ठेवले आहेत. या बंदमध्ये छाेटे माेठे व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत. तसेच कृषी व्यवसायिकांनी देखील बंदला पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानीने सोयाबीनला किमान ८ हजार रुपये भाव देण्यात यावा. पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी. यलो मोझ्याकच्या तक्रारी ग्राह्य धरून संपुर्ण पीक विमा मंजूर करावा. खरीप 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात यावी व 2022 मध्ये झालेया अतिवृष्टी व गारपिटची मदत राहिलेल्या शेतकऱ्यांना (farmers) तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Malegaon Bandh
PM To Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीतील विकासकामांचे लोकार्पण होणार : खासदार सुजय विखे-पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com