MSRTC News : तिकिट तफावत प्रकरणी एसटीचे ११ अधिकाऱ्यांसह कर्मचारी निलंबित

एसटी महामंडळांच्या वाहकांबाबतही काही तक्रार असल्यास नजीकच्या बसस्थानाकात कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
MSRTC , amravati
MSRTC , amravatiSaam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News : राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात तिकीट साठ्यात तफावत आढळून आल्याने या प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. एसटी महामंडळातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

MSRTC , amravati
Latur Accident News : ट्रक- कार अपघातात न्यायाधीशांचा मृत्यू, चालक फरार, पाेलिस तपास सुरु

एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात सन २०१९ ते २०२२ या कालावधीत प्रवाशाच्या तिकीट साठ्यामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला होता. तिकीट साठा अद्ययावत न ठेवता या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहायक वाहतूक अधिकारी, तत्कालीन आगार लेखापाल यांच्यासह सहा लिपिक, ३ वाहतूक नियंत्रक अशा अमरावती आगारातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आलेली आहे.

MSRTC , amravati
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

एसटी महामंडळातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रवाशांनी बसमध्ये बसल्यानंतर वाहकाकडून तिकीट घेतल्यानंतर राहिलेले सुटे पैसे देखील घ्यावेत. अनेकदा प्रवाशी पैसे मिळाले नाही असे सांगतात. प्रवाशांना बस स्थानाकावर देखील पैसे दिले जातात असेही एसटीच्या सूत्रांनी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com