Maharashtra Politics: ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम, विजयी मेळावा फक्त मराठीपुरताच,इगतपुरीच्या शिबिरात ठरणार मनसेची रणनिती

Marathi Unity Event And Its Political Implications: मराठी मुद्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंची युती कधी होणार याकडे राज्याचं लक्ष आहे. ठाकरे सेना युतीसाठी आग्रही असताना राज ठाकरे मात्र मौन बाळगून आहेत. मनसेच्या इगतपुरीच्या शिबीरातून राज ठाकरे पदाधिका-यांना काय कानमंत्र देतात याकडे सगळ्याचं लक्ष आहे. पाहूया एक रिपोर्ट...
Raj Thackeray during the MNS strategy camp in Igatpuri; political alliance decision still under wraps.
Raj Thackeray during the MNS strategy camp in Igatpuri; political alliance decision still under wraps.Saam Tv
Published On

मोठा गाजावाजा होऊन मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. विजयी मेळाव्यातून सरकार विरोधात ठाकरे बंधूच्या रुपाने मोठा विरोधी चेहरा समोर आला आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंची वज्रमुठ आवळली असली तरी अजून अधिकृतपणे दोन्ही पक्षांची युतीची घोषणेची उत्सुकता असताना राज ठाकरेंनी युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. विजयी मेळावा हा केवळ मराठीपुरताच होता असं विधान करून खळबळ उडवून दिलीय... तर युतीचा निर्णय कधी घेणार? त्याचेही स्पष्ट संकेत दिलेत.....

- मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही

- नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय

याआधीही मराठीच्या मुद्दयावर एकत्र आंदोलन लढवल्यानंतर राज आदेश जारी होऊन प्रवक्ते आणि नेत्यांना जाहीरपणे कुठलंही वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली होती.

इगतपुरीच्या तीन दिवसीय शिबिरात राज ठाकरे काय कानमंत्र देणार कुठली मोठी घोषणा करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच राज ठाकरे यांनी मात्र युतीचा सस्पेन्स आता पुढचे चार महिने कायम ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com