Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह नेमकं कुणाचं? सुनावणीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं? यावर आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार होती. पण कोर्टाने ही सुनावणी एका महिन्यासाठी पुढे ढकलली. १२ नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे.
Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह नेमकं कुणाचं? सुनावणीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shiv Sena NewsSaam TV
Published On

Summary -

  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

  • पुढील सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबरला होणार

  • ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला

  • पुढच्या महिन्यात शिवसेना पक्षाबाबत येणार निर्णय

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी पार पडणार होती. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबरला होणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया...

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज त्याबाबत अंतिम निर्णय होणार होता. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करण्यास सुरूवात देखील केली होती. पण कपिल सिब्बल यांनी युक्तीवादासाठी आणखी वेळ मागितला यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने थेट पुढच्या महिन्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह नेमकं कुणाचं? सुनावणीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?
MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

शिवसेनेबाबात निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढील तारीख दिली आहे. आता १२ आणि १३ नोव्हेंबरला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टामध्ये अंतिम सुनावणी सुरू झाली. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करण्यास सुरूवात केली. जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकर करा अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली. पण दुसरे वकील मध्यस्थी करत असताना कपिल सिब्बल यांना थांबवण्यात आले. त्यांनी आधीच या प्रकरणाच्या सुनावणीत खूप वेळ गेला आहे आता याची सुनावणी घ्या असे सांगितले.

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह नेमकं कुणाचं? सुनावणीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी युक्तीवादासाठी ४५ मिनिटांचा वेळ मागितला होता. यावेळी त्यांनी कोर्टाला महापालिका निवडणुकांबाबत देखील सांगितले. पण कोर्टाने पालिका निवडणुका जानेवारी महिन्यात आहेत. त्याआधी आपण सुनावणी घेऊ असे कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाने येत्या १२ आणि १३ नोव्हेंबरला या प्रकरणावर अंतिम युक्तीवाद होईल असे सांगितले आणि सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे आता शिवसेना कुणाची याचा निर्णय पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे.

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह नेमकं कुणाचं? सुनावणीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com