10 वीच्या परीक्षेत शाळा कर्मचाऱ्यांकडून मुलांना कॉपीचा पुरवठा; घटनेचा Video व्हायरल

दहावीच्या गणित विषयाच्या पेपरवेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Gondiya School
Gondiya SchoolSaam TV
Published On

गोंदिया - गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 24 मार्च रोजी घेण्यात आलेल्या दहावीच्या गणित विषयाच्या पेपर दिवशी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद (CCTV) झाला असून या व्हिडीओमध्ये विद्यार्थी गॅलरीतून खाली वाकून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काही शिक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला असून शाळेतील एका परिचारकाने सूड बुद्धीतून व्हिडियो तयार करीत वायरल केल्याचा आरोप शाळेतील (School) मुख्याध्यापिका एम टी हुमणे यांनी केला आहे. मात्र मुख्याध्यापिका महोदयांच भांडण जरी वैयक्तिक असलं तरी कॉपी करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न पालकांना पडला आहे.

हे देखील पहा -

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बहुउदेशिय शाळेतील हा प्रकार असून याच शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून काम करणाऱ्या राहुल ब्राह्मणकर यांची पत्नी देखील याच शाळेत शिक्षिका असून त्यांना संस्थाचालकाने मुख्याध्यापिकांच न पटल्याने राहुल माझ्या शाळेची बदनामी करीत असल्याचा मुख्याध्यापिका हुमणे यांचे म्हणणे आहे.

तर राहुल ब्राम्हणकर हे या शाळेतील एका खोलीत बळ जबरीने राहत असून त्यांनीच हा व्हिडियो तयार केल्याचा आरोप मुख्यध्यापिकांनी केला आहे मात्र या दोंघांच्या भांडणात होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले जात असल्याचा दिसत आहे. दरम्यान या संदर्भात शिक्षण अधिकारी याना विचारणा केली असता कुठल्याही पालकाने या संदर्भात तक्रार केली नसली तरी प्रसार माध्यमांनी ज्या बातम्या दाखविल्या आहेत,त्या अनुसंघाने गट शिक्षण अधिकाऱ्यांना मार्फत शाळेत घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com