अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

Sunetra Pawar Deputy CM Oath Ceremony Maharashtra: अजित पवारांच्या अस्थीविसर्जनानंतर अवघ्या 24 तासात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतलेत... मात्र 24 तासात राजकीय घडामोडी कशा घडल्या..
Sunetra Pawar arrives at Raj Bhavan for the oath-taking ceremony as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.
Sunetra Pawar arrives at Raj Bhavan for the oath-taking ceremony as Maharashtra’s first woman Deputy Chief Minister.Saam Tv
Published On

दिनांक

30 जानेवारी 2026

दुपारी 4.08 वा. निरा आणि कऱ्हा नदीच्या संगमावर अजित पवारांच्या अस्थिचं कुटुंबियांकडून विसर्जन करण्यात आलं...त्याआधीच दादांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राजकीय हालचालींना वेग आला... त्यानंतर विधीमंडळ पक्षनेता आणि पक्षाच्या नेतृत्वासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही नागपूरमध्ये प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी जो प्रस्ताव देईल त्याला पाठींबा देण्याचं सुतोवाच केलं...

मुंबईत दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना फोनवरून शपथविधीसाठी येण्याची विनंती केली... त्यानंतर रात्री सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या...पहाटे सुनेत्रा पवार मुंबईत अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीवर दाखल झाल्या.... दुसरीकडे पुण्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाविषयी आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं

पवारांच्या वक्तव्यानंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला... सकाळी साडेदहा वाजता सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांच्या भेटीसाठी दाखल झाले...एकमेकांशी चर्चा केल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता दोन्ही नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहचले...दुसरीकडे पुण्यात पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पार्थ पवारांची धावाधाव झाली.. त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता गोविंदबागेत शरद पवारांची तब्बल दीड तास चर्चा केली...

याच दरम्यान मुंबईत 12.15 मिनिटांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे देवगिरीवर पोहोचले... त्यानंतर सर्व नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी चर्चा केली..ही चर्चा पूर्ण होत असतानाच दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सिग्नल दिला.. आणि सर्व आमदार 1.30 मिनिटांनी विधानभवनात पोहोचले..

त्यानंतर 2 वाजता प्रमुख नेत्यांसह सुनेत्रा पवार विधानभवनात पोहोचल्या... छगन भुजबळांनी आधी गटनेता आणि त्यानंतर पक्षाच्या प्रमुखपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला... त्याला दिलीप वळसे पाटलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनुमोदन दिलं... यानंतर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली.. सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर छगन भुजबळांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले..

त्यांनी 3.40 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांना सुनेत्रा पवारांच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र देण्यात आलं... त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनवर पोहोचले आणि त्यांनी सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाची शिफारस केली.. त्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्याला मान्यता देत लोकभवनमध्ये शपथविधीला मंजूरी दिली... आणि त्यानंतर 5 वाजून 10 मिनिटांनी सुनेत्रा पवारांनी अखेर राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com