Chhatrapati Sambhaji Nagar Summer Heat: उष्माघातापासून बचाव होण्यासाठी काय करावे काय करू नये?; जिल्हाधिकाऱ्यांनी थेट परिपत्रकच काढलं

या समस्यांमधून आपला बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
Heat Wave
Heat WaveSaam Tv

Heat Wave : राज्यात सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरू आहे. नागरिक उष्णतेमुळे हैरान झाले आहेत. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. प्रखर सूर्याची किरणे थेट डोक्यावर पडल्यानंतर अनेक व्यक्तींना चक्कर येणे, डोकेदुखी होणे अशा समस्या जाणवतात. या समस्यांमधून आपला बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

कडक उन्हाळा असल्याने यामध्ये काही व्यक्तींना उष्माघाताचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या देखील उभ्या राहतात. अशात नागरिकांनी नेमकी कशी काळजी घ्यावी यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रकच काढलं आहे. एकीकडे कोरोना विषाणू राज्यभर पसरतोय तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी एक परिपत्रक काढत जनतेला सुरक्षा घेण्याचे आवाहन केले आहे.

Heat Wave
Wardha Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; पोलिसांनी असा केला बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, नेमकं काय आहे प्रकरण?

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची (काय करावे?)

1. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

2. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

3. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

4. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

5. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

6. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

7. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

8. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

9. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

Heat Wave
Crime News : जीव वाचवला म्हणून पित्यानेच केली मुलीची हत्या; धक्कादायक घटनेनं जम्मू-काश्मीर हादरलं

10. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

11. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

12. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

13. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

14. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

15. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.

16. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत अ विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

17. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

18. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व

पहाव्यात.

19. जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना पहाव्यात.

Heat Wave
Marathwada Farmer : मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; 3 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी उघडकीस

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करु नये ?)

1. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.

2. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

3. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

4. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

5. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

6. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

7. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

8. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com