Vikhe vs Thorat: जयश्री थोरातांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य, सुजय विखेंकडून निषेध; म्हणाले...

Sujay Vikhe vs Balasaheb Thorat : गाड्या जाळणाऱ्यांचे व्हिडीओ-फोटो आमच्याकडे आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे विखेंनी सांगितले.

Congress vs BJP Clash : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र जाळपोळ करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. गाड्या जाळणाऱ्यांचे व्हिडीओ-फोटो आमच्याकडे आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे विखेंनी सांगितले.

सुजय विखे काय म्हणाले ?

वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करणारच होतो.

मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.

गाड्या जाळणाऱ्यांचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आहेत. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही.

या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.

महिलांबद्दल कुणीही अशी टीका करू नये

माझ्या भाषणात मी जयश्री थोरात यांना ताई म्हणूनच संबोधित करतो.

मलाही बहीण आहे, माझ्याही घरात महिला आहेत.

मात्र कुणीही महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

आचारसंहिता दोन्ही बाजूंसाठी पाहिजे.

आज त्या महिला असल्याने त्यांच्या प्रकरणात जनतेने रोष व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बिनडोक मुलगा, बोगस डॉक्टर, हा डोक्यावर पडलाय अशी वक्तव्य माझ्याबद्दल झाली. मग आमचे लोक देखील कायदा सुव्यवस्था हातात घेऊ शकतात. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही, सर्वांनी संयमाची भूमिका घ्यावी.

Sujay Vikhe vs Balasaheb Thorat
विखे-थोरात वाद टोकाला! संगमनेरमध्ये जाळपोळ, पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या; जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

संगमनेरमध्ये तणावपूर्ण शांतता

काल रात्री थोरात आणि विखे समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार राड्यानंतर सध्या संगमनेरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वसंत देशमुख यांच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जाळपोळ, तोडफोड प्रकरणी तसेच महिलांना अपशब्द वापरल्याप्रकरणी आणखी तीन गुन्हे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. काल संगमनेरच्या धांदरफळ मध्ये सुजय विखे यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com