Sujay Vikhe Patil: 'महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत' सुजय विखे पाटील यांचं विधान चर्चेत; वडील काय म्हणाले?

Sujay Vikhe Patil on free meal: संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. असं विधान सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ज्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSaam Tv News
Published On

शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जेवणासाठी लागणारे पैसे मुला - मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. असं विधानही सुजय विखे पाटील यांनी केलंय. ज्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावर वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'साईभक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील', असं म्हणत आपली भूमिका मांडलीय.

शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं, अशी माझी विनंती आहे. ग्रामस्थांसोबत मीटिंग घेऊन निश्चित करा. आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली तरी आम्ही करू, असं सुजय विखे पाटील म्हणाले. तसेच इथं कुणीही गरीब नाही. संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय. दहा रूपयांचं जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो. अन्नादानाला जे पैसे जात आहेत, तेच पैसे मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा. अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा काही लोकांनी विपर्यास केला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. मध्यंतरी भिक्षेकर्‍यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले होते. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील, हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Sujay Vikhe Patil
Shirdi Sai Baba : साईबाबा चरणी कोट्यवधींचे दान; नववर्षानिमित्त ६ लाख भाविक शिर्डीत

भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिर्डीत येणार्‍या साई भक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळाले पाहिजे. शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com