Sugar Factory : राज्यातील या ११ साखर कारखान्यांना 1590 कोटींची मदत; NCDC कडून गाळप हंगामाआधी दिलासा

Sugar Factory News : ऊस गाळप हंगाम चालू होण्यापूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या साखर ११ कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम NCDC यांच्याकडून 1590 कोटी रुपयाची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
Shugar Factory
Shugar FactorySaam Digital
Published On

ऊस गाळप हंगाम चालू होण्यापूर्वी आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखानदारांना दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम NCDC यांच्याकडून मंजूर झालेली 1590 कोटी रुपयाची आर्थिक मदत राज्यातील 11 सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सहकार विभागाचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Shugar Factory
Gunratna Sadavarte On Supreme Court : SC, ST आरक्षणाबाबतचा निकाल चुकीचाच ; गुणरत्न सदावर्तेंचं सुप्रीम कोर्टाच्या निकालालाच आव्हान

1.अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना 97 कोटी .

2.अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या 2 युनिट असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यांना 327+140 कोटी असे एकूण 467 कोटी मंजूर

3. लोकनेते मारुतीराव घुले यांच्या ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा 140 कोटी .

4.अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना 94 कोटी रुपये .

5.अंबाजोगाई येथील सहकारी साखर कारखाना 80 कोटी रुपये

6. अजित पवार यांच्या गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांच्या शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा 103 कोटी .

7.संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा 94 कोटी .-भाजप समर्थक आमदाराच्या गटाला .

8.भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी 93 कोटी .

9. माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई साखर कारखान्याला 94 कोटी रुपये .

10.भाजप समर्थक अपक्ष आमदार विनय कोरे यांच्या वारणा सहकारी साखर कारखान्याला 327 कोटी रुपये रक्कम मंजूर .

एकूण 11 सहकारी साखर कारखान्याच्या 1590 कोटी रुपये पैसे वर्ग करण्यात आले आहेत.

Shugar Factory
Pune Konkan Highway : पुण्यातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग खचला; वाहतूक ५ ऑगस्टपर्यंत बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com