एफआरपीवरून आणि टोल प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एफआरपीसोबत प्रतिदर ४०० रुपये वाढीव रक्कम कारखान्यांनी द्यावी अन्यथा कारखाने बंद पाडू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय. याचबरोबर त्यांनी सुरत-चेन्नई महामार्ग अधिगृहनाबाबतीत प्रशासन हुकमशाही पद्धतीने वागलं तर कायदा हातात घेऊ, असाही इशारा दिला. (Latest News)
मागच्या वर्षभरामध्ये साखरेला चांगला भाव राहिला आहे. सरकराने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा ५०० रुपये जास्त किमत साखरेला मिळाली आहे. तसेच कारखान्यांना इथेनॉलमधूनही चांगली कमाई मिळाली आहे. अनेक कारखान्यांनी साखरेचे उत्पन्न कमी करता इथेनॉलच उत्पादन घेतलं आहे. जर एक टक्का रिकव्हरी साखरेचं उत्पन्न घेतले असते तर शेतकऱ्यांना त्यातून ३०७ रुपये मिळाले असते. पण त्याच एक टक्का रिकव्हरीपासून कारखाने ५४० किमतीचं इथेनॉल तयार करतात.
इथेनॉलचा उत्पादन खर्च ७२ रुपये वजा जाता. ४६८ रुपये राहतात. त्यातील ३०७ रुपये जरी वजा केले तरी १६१ अतिरिक्त रक्कम वाचते असते. असे तीन ते चार रिकव्हरी कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी वापरले आहे. ते पैसे कारखान्याकडे शिल्लक आहे. त्या सगळ्याचा मेळ घालून निदान ४०० रुपये एफआरपी देऊन सुद्धा ज्यादा शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. हे पैसे ते जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत यंदाचा सीझन सुरू करू देणार नाही, हा आमचा इशारा असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
सुरत-चेन्नई महामार्ग बाबत जे जिल्हाधिकारी आहेत ते हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. त्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्याने जास्त हुकूमशाही केली तर शेतकऱ्यांचा हिसका काय असतो ते दाखवू. आमची शेतजमीन ही हक्काची आहे. ही जमीन पिढ्यान् पिढ्याने सांभळलीय. तसेच सरकारने कायदा करून जमिनीचा मिळणारा मोबदला ६० टक्क्यावरुन ४० टक्के केला तर ते चालणार नाही. जर जिल्हाधिकाऱ्याचे पगार ४० टक्के कमी केला तर चालेल का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी यावेळी केला. जमीन अधिग्रहण करताना पोलीस बळाचा वापर झाला तर आम्ही कायदा हातात घेऊ असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सरकारला टोलवरून धारेवर धरले. रोड टॅक्स घेणं चुकीचं आहे. वाहन घेतल्यानंतर सरकार एकाचवेळी रोड टॅक्स घेत असते. मग हे टॅक्स परत घेतले जाते. डिझेलसाठी फक्त ३५ रुपये लागतात. त्यावरील पैसे हे सरकारकडे असतात. मग वाहन चालकांनी किती पैसे सरकारला द्यायचे, असे राजू शेट्टी म्हणाले.
याचबरोबर राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करणाऱ्या बच्चू कडू यांना युतीचे आमंत्रण दिलं. आगामी निवडणुका आपण तर स्वबळावर लढणार आहोत. पण बच्चू कडू हे युतीसाठी आले आपण त्यांचे स्वागत करू असं ते म्हणालेत. बच्चू कडूंची सरकारमध्ये घुसमट होतीय ते सोबत आले तर स्वागत करू, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
दरम्यान पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुका लढवणार का असा प्रश्न केला. त्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांचे विचार आणि विचार करण्याची शैली वेगळी आहे. ते फार मोठ्या उंचीचे नेते आहेत त्यामुळं जमेल, असं वाटत नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित आघाडीसोबत जाणार नसल्याची राजू शेट्टी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.