दिनेश पिसाट
रायगड - जीवनात मोठे ध्येय बाळगून त्याला कृती व परिश्रमाची जोड दिल्यास कोणतीही गोष्ट कठीण नसते हे रायगड Raigad जिल्ह्यातील सुधागड तालुक्यासारख्या दुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यातील दोन तरुणींनी दाखवून दिले आहे. सुधागड Sudhagad मधील या दोन तरुणींची यशोगाथा Success story सर्वाना प्रेरक ठरते आहे. success story of two young women from raigad
सुधागड तालुक्यातील पायरीची वाडी जवळील स्वतःच्या शेतात त्यांनी आधुनिक पद्धतीने कलिंगडची लागवड केली आहे. कृषीविषयक शिक्षण घेत असतांनाच या दोन तरुणींनी या वर्षी मे पासून कलिंगड लागवडीच्या कामाला सूरवात केली. जून मध्ये पावसाळी कलिंगड लागवड करून त्यांनी तब्बल 4 ते 5 टन कलिंगडचे पीक घेतले आहे.
हे देखील पहा -
पालीतील ऐश्वर्या सचिन जवके आणि साक्षी पवार या दोन तरुणींनी मोठ्या परिश्रमाने भर लॉकडाऊन काळात कलिंगडाचे पीक घेण्याचा संकल्प केला आणि माळरान भागात उपलब्द असलेल्या आपल्या शेतीत नंदनवन करण्याचे काम केले. ऐश्वर्या जवकेने बीएससी एग्रीकल्चर तर साक्षी पवारने बीएससी होर्टी कल्चरचे शिक्षण घेत आहे. यातून त्यांना शेतीची आवड निर्माण झाली आणि त्यांनी शेती करण्याचा संकल्प केला. कलिंगड लागवडीचा आता सिजन नाही, वेळ निघून गेली होती, त्यात कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आहे, बापाचे पैसे वाया घालवाल असे टोमणे त्यांना काहींनी मारले. success story of two young women from raigad
पण या टीकेमुळे दोघींनी आपले पाऊल मागे न घेता त्यांनी शेती कसण्यास सुरुवात केली. आधुनिक पद्धतीने रोप लागवड केली आणि चार ते पाच टन इतक्या प्रमाणात उत्पादन काढून दाखवले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.