Maharashtra Police Bharti : पाेलिस भरतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा सुळसुळाट ? 15 जणांची चौकशी सुरु

यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
police bharti, gadchiroli, sports certificate
police bharti, gadchiroli, sports certificatesaam tv
Published On

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या संशयावरुन दोन नवनियुक्त पोलिसांसह प्रतीक्षेतील एकास गडचिराेली पाेलिसांनी नुकतीच अटक केली होती. प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव करुन तसे प्रमाणपत्र सादर करून काहीजण पाेलिस दलात भरती झाले. त्यानंत पोलीस अधीक्षक नीलोत्पल (neelotpal ips) यांना बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा शाेध घेण्यास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

police bharti, gadchiroli, sports certificate
Ashadhi Wari 2023 : ...अन्यथा वारी थांबवू : वारकरी साहित्य परिषदेचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या माध्यमातून देखील लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून निवड झालेल्या १५ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

police bharti, gadchiroli, sports certificate
Yavatmal News : कुटुंबियांनी 5 दिवसाच्या बाळास दिले बिब्याचे चटके, डाॅक्टरांचे बाळाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

जिल्हा पोलीस दलातच चार महिन्यांपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३४८ जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. परंतु हे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे गडचिरोलीचे रहिवासी असताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे केला होता.

police bharti, gadchiroli, sports certificate
Success Story : कष्टकरी कुटुंबातील युक्ताला Youtube ची मिळाली साथ, Neet परीक्षेत मिळविले उज्जवल यश

आता बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन पोलीस दलात भरती झालेले उमेदवार देखील चौकशीच्या रडारवर आले आहेत, बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन त्यांनी खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका आहे. त्यानुषंगाने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com