submarine and scuba diving project in vengurla soon
submarine and scuba diving project in vengurla soonSaam Digital

वेंगुर्ल्याच्या पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणार, पाणबुडीसह स्कूबा डायव्हिंगवर शिक्कामोर्तब; जाणून घ्या प्रकल्पाविषयी

submarine and scuba diving project in vengurla soon: यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाचा चेहरामोहराच बदलणार आहे. कोकणातील समुद्र किनारे आणि समुद्राच्या अंतरंगातील सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक आता कोकणात येणार आहेत.
Published on

- विनायक वंजारे

आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ले बंदर परिसरात व स्कूबा ड्रायव्हिंग प्रकल्पही वेंगुर्ले मालवण दरम्यान समुद्रात होणार आहे. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात 66 कोटींच्या भरीव निधीची तरतूद करून या प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे.

नौदलाच्या युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे पुढील अवघ्या आठ महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनालाही आता खऱ्या अर्थाने झळाळी मिळणार आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार असताना 2019 मध्ये तत्कालीन अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शासनाला हा प्रकल्प सादर केला होता. यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर या प्रकल्पाला ब्रेक लागला.

submarine and scuba diving project in vengurla soon
Lonavala Tourism New Rule : लोणावळ्यात पर्यटनास जाणार आहात? जिल्हाधिका-यांनी दिली महत्वपूर्ण माहिती (पाहा व्हिडिओ)

दरम्यान दोन वर्षा पूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल. दिपक केसरकर मंत्री झाले. यानंतर आदित्य ठाकरेंनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याचा आरोप केला आणि महायुती सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंमुळेच हा प्रकल्प होऊ शकला नाही ते पर्यटन मंत्री झाले आणि हा प्रकल्प रखडला असा आरोप केला. या प्रकल्पावरून तेव्हा अनेक आरोप प्रत्यारोप झाले.

अखेर या प्रकल्पाला महायुती सरकारने मंजूरी दिली असून अर्थसंकल्पात या प्रकल्पाला 66 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेंगुर्ल्यातच होणार हे आता स्पष्ट झाल आहे. या प्रकल्पामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला झळाळी मिळणार आहे. तर वेंगुर्ला शहर आंतरराष्ट्रीय पर्यटनावर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

कसा असेल हा प्रकल्प?

हा प्रकल्प वेंगुर्ला बंदरापासून समुद्राच्या आत आठ किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात पाण्यामध्ये उभारला जाणार आहे. यासाठी 66 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सात आठ महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी पर्यटकांना विशेष बोटीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या बोटीतून बंदरापासून पाणबुडी प्रकल्पावर गेल्यानंतर पाण्याच्या आत समुद्राच्या अंतरंगातील जग न्याहळता येणार आहे. यासाठी एक दिवसाचं पर्यटकांना पॅकेज दिले जाणार आहे. त्यामध्ये जेवण, नाश्ता आणि याशिवाय अन्य गोष्टींचाही समावेश असणार आहे.

त्यामुळे वेंगुर्ला बंदराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असून वेंगुर्ले बंदराचे आणि समुद्र किनाऱ्यानजिकचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास अजून 44 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तर 66 कोटी रुपये पाणबुडी प्रकल्पासाठी मंजूर जरी असले तरी सुमारे 205 कोटी रुपये प्रकल्पासह सुशोभीकरणावर खर्च होणार आहेत. त्यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाचा चेहरामोहराच बदलणार आहे. कोकणातील समुद्र किनारे आणि समुद्राच्या अंतरंगातील सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक आता कोकणात येणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

submarine and scuba diving project in vengurla soon
Konkan Tourism : काेकणातील पर्यटनासाठी 'हाऊसबाेट' ची संकल्पना; गुहागरच्या युवकाची कल्पकता (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com