...तर सोलापुरात पाऊल ठेऊ देणार नाही; सुभाष देशमुखांचे दत्तात्रय भरणेंना आव्हान

दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Subhash Deshmukh
Subhash DeshmukhSaam Tv
Published On

सोलापूर: सोलापुरात (Solapur) उजनीच्या पाण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी उजनीचे पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप सोलापुरातून करण्यात आला आहे. आता माजी मंत्री सुभाष देशमुख यांनीही भरणे यांना आव्हान दिले आहे. उजनीचे पाणी पळवाल तर सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री देशमुख यांनी दिला आहे.

उजनीच्या (Ujani Dam) पाण्यावरुन मागिल वर्षीही असाच वाद सुरु होता. आता या वर्षीही पाण्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून (Farmer) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Subhash Deshmukh
पुण्यात राज ठाकरेंची सभा होणारच, सभेची तारीख अन् जागाही ठरली

सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री आणि इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी पाणी योजनेसाठी उजनीतून दोन टीएमसी पाणी मंजूर करून घेतले आहे. सोलापूरच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी उचलण्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. त्यामुळे या प्रश्नावरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ३४८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे दोन टीएमसी पाणी कमी होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

'पालकमंत्री दत्तात्रय भरणे आपण इंदापूरचे लोकप्रतिनिधी जरूर आहात. मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात, पण ज्यावेळेस एका जिल्ह्याच पालकत्व घेताय, त्यावेळी जिल्ह्यावर कुठला अन्याय होणार नाही. अशी आपली भूमिका असली पाहीजे. परंतु, भरणे मामा आपण निष्ठुर आणि स्वार्थीपणे वागत आहात'. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पाण्यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केलं आहे.

त्याचबरोबर उजनीच्या पाण्याचा एकही थेंब हा पुणे जिल्हा, इंदापूर तालुका,बारामती तालुक्याला जाऊ देणार नाही आणि पाणी पळवणाऱ्या पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही असं असं आवाहन ही माजी सहकार मंत्र्यांनी दिलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com