पुण्यात राज ठाकरेंची सभा होणारच, सभेची तारीख अन् जागाही ठरली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार की नाही याबाबतच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam Tv
Published On

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा पुण्यात होणार की नाही याबाबतच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. राज ठाकरेंची सभा पुण्यातच होणार असून सभेची तारीख आणि ठिकाण मनसेकडून सांगण्यात आलं आहे. दिनांक २२ मे रोजी पुण्यातील (Pune) गणेश कला क्रिडा रंगमंच सभागृहात राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसंच ही सभा सकाळी १० वाजता होणार असून पुणे मनसेकडून १७ तारखेलाच गणेश कला क्रिडा रंगमंच सभागृह आरक्षित देखील करण्यात आलं आहे.

हे देखील पाहा -

मशिदीवरील भोंग्याबाबात आक्रमक पवित्रा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ राज हे पुण्यात सभा घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे राज यांची सभा होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान पुण्यीतील सभा रद्द करावी लागणार अशी चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र, आता सभेसाठी परवानगी मिळवत ही सभा गणेश कला क्रीडा रंगमंदिरात सभा होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com