Pet Dog: तुम्ही कुत्रा पाळलाय...सावधान! नियम पाळा अन्यथा कुत्रा जप्त

Dangerous Dog Breeds in Spotlight: तुम्ही कुत्रे पाळत असाल...तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे... पाळीव श्वानधारकांसाठी आता कडक नियम जारी करण्यात आलेत.. काय आहेत हे नियम? पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय निर्णय घेण्यात आलाय पाहूयात?
Municipal action against dangerous pet dog breeds; owners must follow new safety rules or face seizure of pets.
Municipal action against dangerous pet dog breeds; owners must follow new safety rules or face seizure of pets.Saam Tv
Published On

हा व्हीडीओ पाहा... गार्डनमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलावर पिटबुलनं हल्ला केला.. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या तोंडाला 150 टाके पडले . आता तुमच्या घरातही रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन सारखे पाळीव कुत्रे पाळलेले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...

हिस्त्र कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरायला नेत असाल तर तुम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागेल..कारण जर एखादी अशीच घटना घडली तर थेट मालकाला जबाबदार ठरवून त्याच्यावरच कारवाई केला जाणार आहे.

रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन जातींच्या कुत्र्यांचा स्वभाव अतिहिंस्त्र असतो. त्यामुळे कुत्र्यांना बाहेर फिरवताना त्यांच्या तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असेल, तसचं कुत्र्यांना चेन किंवा बेल्ट लावणं ही आवश्यक आहे. हे नियम न पाळल्यास कुत्रे जप्त करून मालकांवरही कारवाई केली जाणार, असल्याचं पालिकेनं आदेश सांगितलयं.

सध्या तरी कोल्हापूर महापालिकेनं आपल्या हद्दीतील पाळीव कुत्र्यांच्या मालकांना हा आदेश लागू केलेला असला तरी असा आदेश इतर महापालिकांनी अंमलात आणण्याची गरज आहे. दुसरीकडे भटक्या कुत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याचं काय? त्यांचा बंदोबस्त कधी केला जाणार? असा सवाल कोल्हापूरकरांकडून उपस्थित केला जातोय... आता पाळीव कुत्र्यांप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती खबरदारी घेणार? याकडे नागरिकाचं लक्ष लागलयं....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com