सचिन अग्रवाल
अहमदनगर : राज्यात कोरोना (Corona Virus) रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अद्याप काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच राज्यात तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोकाही वर्तवण्यात आला आहे. अशातच राज्यात अहमदनगर जिल्ह्यातही (Ahamadnagar District) पारनेर (Parner) तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे पारनेरमध्ये कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता तहसीलदार ज्योती देवरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेलया माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील 22 गावांत कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. या काळात लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ आयोजित करण्यासाठी पुर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. तसेच, बाहेरुन आलेले पाहुणे ७ दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करणार, असल्याचा इशाराही यावेळी ज्योती देवरे यांनी दिली आहे.
तसेच विविध ठिकाणी चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तिनाही शाळेतील विलगीकरणातच राहावे लागणार आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांचीदेखील मुख्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने त्यानंही मुख्यालयसोडता येणार नाही. वॉर्डनिहाय प्रत्येक गावात शंभर टक्के कुटुंब तपासणी व कोरोना चाचणी केली जाईल. या चंचण्यांमध्ये रुग्ण आढळून आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणे बंधनकारक असेल. याशिवाय, चौकात पारावर विनाकारण बसणारे आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे फोटो काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पारनेर तालुक्यात नव्या रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सध्या तालुक्यात साडेचारशेहून अधिक उपचार घेत आहेत. जुलै महिन्यात पारनेरमध्ये रूग्ण संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. पारनेरमध्ये 1 जुलै रोजी 56 रुग्णसंख्या होती त्यात वाढ होऊन 9 जुलै रोजी ही संख्या ८४ वर पोहचली आहे.
या गावांमध्ये लागणार कडक लॉकडाऊन
वडगाव गुंड, शिरसुले, निघोज, वाळवणे, पठारवाडी, लोणी हवेली, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, रायतळे, लोणीमावळा, हत्तलंखिंडी, भाळवणी, धोत्रे, पिंप्री जलसेन,पठारवाडी, जवळा, पिंपळगाव रोठा, पोखरी, खडकवाडी, सावरगाव, वनकुटे, काकणेवाडी, या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.