उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घराच्या बाहेर बसलेल्या ४ वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा शरीरावर कुत्र्याने शरीरावर त्यांनी अनेक ठिकाणी कुत्र्याने (Dog) चावा घेत तिला गंभीर जखमी केले आहे. यामुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. सदर चिमुकलीवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. ( Stray dogs attack minor girl in Ulhasnagar )
उल्हासनगरमध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आहे. आरही शेळके असे या चिमुकलीचे नाव आहे. सदर चिमुकली कॅम्प ४ च्या नालंदा नगर सुभाष टेकडी परिसरात राहते. १६ तारखेला आरही घराबाहेर बसली होती. यावेळी अचानक भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आरही गंभीर जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत तिच्या आई-वडिलांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र, त्यांच्याकडे इंजेक्शन नसल्याचे सांगून त्यांना कळवा येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र त्यांच्याकडेही इंजेक्शन नव्हते. त्यानंतर आरहीला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आरहीवर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या सगळ्यामुळे कुत्रा चावल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत या चिमुकलीला तब्बल सहा ते सात तास उपचारापासून वंचित राहावे लागले. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांवर कोणताच बंदोबस्त करत नसल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याचा आरोप आरहीच्या कुटुंबीयांनी केला आहे. चिमुकलीवर हल्ला केल्यानंतर स्थानिकांकडूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.