स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...

सांगलीत स्टोन क्रशरमधून उडणाऱ्या धुरळ्यामुळे ७५ एकरांवरची शेती आणि शेकडो कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मिरजच्या भोसे गावातील नागरिक यामुळे त्रस्त आहेत.
स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...
स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...विजय पाटील
Published On

सांगली: मिरज तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीतील एका माळरानावर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेची परवानगी न घेता 3 वर्षांपूर्वी श्लोक हायटेक कॉन्ट्रॅक्टर नावाने स्टोन क्रशर उभारण्यात आले आहे. या क्रशरच्या अगदी खालच्या बाजूस 7 पिढ्यांपासुन राहणारी जाधव  वस्ती आहे. या भागात 70-75 एकर शेती देखील आहे. मात्र मागील 3 वर्षांपासून इथल्या क्रशरच्या धुळीमुळे या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे एका आमदाराचा मुलगा आणि अन्य 3 जणांच्या पार्टनरशिपमध्ये उभे असलेले हे स्टोन क्रशर हटवावे अशी पीडितांची मागणी आहे. (Stone crusher dust threatens health of hundreds of families, including 75 acres of farmland)

हे देखील पहा -

स्टोन क्रशरमधून उडणारा हा धुरळा 75 एकरावरील शेती आणि शेकडो लोकांचे आयुष्य उद्धवस्त करतोय. 3 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या स्टोन क्रशरमुळे या वस्तीवर राहणाऱ्या लोकांचे आयुष्यच धोक्यात आलं आहे. शेतीत काही कराल ते या धुळीमुळे उद्ध्वस्त होते. बागेला द्राक्ष घड लागलेत, पण द्राक्षच्या बागा धुळीने माखलेल्या असतात. त्यामुळं सगळा हंगाम वाया जातोय. मागील 3 वर्षांपासून केवळ नुकसान सहन कराव लागतंय. मोठ्या अपेक्षेने वांगी लावलेल्या मारुती खोत यांच्या शेतातील वांग्याची झाडेदेखील या स्टोन क्रशरमधील धुळीने माखलेत. त्यामुळे वांग्यामधून उत्पादन कमी आणि नुकसान जास्तच होण्याची भीती त्यांना सतावतेय.

स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...
स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...विजय पाटील

हे झाले स्टोन क्रशरमुळे होणारो शेतीचो नुकसान. याहीपेक्षा नुकसान होतेय ते या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आणि लहान मुलाच्या आरोग्याचे. अनेकांना या सततच्या धुळीमुळे श्वसनाचा त्रास होतोय. काहींना मुतखड्याचा त्रास सुरू झालाय. लहान मुलांना देखील भविष्यात या धुळीमुळे काही ना काही त्रास उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातील घरं देखील नेहमी धुळीने माखून गेलेली असतात. पाण्यात धूळ, कपड्यात धूळ, घरं कितीही वेळा झाडली तरी घरातील धूळ काही हटत नाही. अशा अवस्थेत या भागातील महिला, लहान मुले या धुळीचा त्रास सहन करून जगत आहेत.

स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...
स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...विजय पाटील

एकीकडे शेतीचं नुकसान, दुसरीकडे घरांचे नुकसान, नागरिकांच्या आरोग्य या धुळीमुले धोक्यात आले आहे. तर या धुळीमुळे या वस्तीवरील गवत देखील जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही. माळरानावरील गवत देखील या धुळीत माखून गेले. अशा पध्दतीने सर्वच बाजूंनी या भागात 7 पिढ्यांपासून राहणाऱ्या या नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आले. 3 वर्षात नागरिकांनी ज्या-ज्या वेळेस या स्टोन क्रशर मालकांना क्रशर बंद करा अशी विनंती केली, त्यावेळी या मालकांनी धूळ उडू नये म्हणून आम्ही झाडे लावलेत, शेडनेट लावू, पत्रे लावू अशी केवळ पोकळ आश्वासने दिली. मात्र याने पुन्हा वस्तीत, शेतात धूळ पसरणारच आहे. त्यामुळे काही झाले तरी हे स्टोन क्रशर या भागातुन हलवावेच या मागणीवर या भागातील नागरिक ठाम आहेत.

स्टोन क्रशरच्या धुराळ्यामुळे ७५ एकर शेतीसह शेकडो कुटुंबांचे आरोग्य धोक्यात...
तीन एकर तुरीच्या शेतात सोडले गुरे

याबाबत क्रशर मालकाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतां आम्ही धूळ उडू नये म्हणून आम्ही झाडे लावलेत. शेडनेट लावू, पत्रे लावणार आहोत असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 7 पिढ्यांपासून ज्या भागात जी वस्ती वसली आहे त्याठिकाणी मागील 3 वर्षांपूर्वी उभारलेल्या एका उद्योगाने ही वस्ती आणि त्यांची शेती नुकसानग्रस्त होत असेल तर ही बाब गंभीर आहे. याशिवाय या नागरिकांच्या जीवाशी हा उद्योग कारणीभूत ठरत असेल तर प्रशासनाने यात लक्ष घालून सर्व नियम पायदळी तुडवून उभारलेल्या हा उद्योग बंद करण्याची गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com